कोपर्डे हवेली : पोदार स्कूलमध्ये ''बियाॅंड ट्रॅव्हल इन द डिजिटल एरा'' चे आयोजन

कोपर्डे हवेली : पोदार स्कूलमध्ये ''बियाॅंड ट्रॅव्हल इन द डिजिटल एरा'' चे आयोजन

Published on

विद्यार्थ्यांकडून डिजिटल पर्यटनाची संकल्पना

कोपर्डे हवेलीच्या पोदार स्कूलमध्ये ‘डिजिटल एरा’ उपक्रम उत्साहात

कोपर्डे हवेली, ता. ७ : येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये ‘बियाँड ट्रॅव्हल इन द डिजिटल एरा’ उपक्रम उत्साहात झाला. कार्यक्रमाचे उद्‍घाटन प्रमुख पाहुण्या अश्विनी जयवंत शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी डिजिटल युगातील पर्यटनाची संकल्पना प्रभावीपणे मांडल्या. त्यांनी थायलंड, चीन, जपान, तसेच भारत आणि भारतातील विविध राज्यांच्या संस्कृती, परंपरा आणि खाद्यसंस्कृतीचे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांनी संबंधित देशांच्या पारंपरिक वेशभूषेत सज्ज होऊन पदार्थ तयार केले, त्यांची वैशिष्ट्ये सांगितली आणि त्या देशांच्या भाषेत बोलण्याचा प्रयत्न केला. हे सादरीकरण पाहून उपस्थितांनी कौतुक केले.
इयत्ता पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांनी ‘ट्रॅव्हलिंग एक्सपिरीयन्स’ अंतर्गत प्रवास आणि नैसर्गिक गोष्टींवर आधारित गाणी, नृत्य, नाटिका आणि प्रदर्शन सादर केले. इयत्ता तिसरी आणि चौथीच्या विद्यार्थ्यांनी ‘मॅजिकल मोशन’ उपक्रमांतर्गत द्रव्याच्या अवस्थांवर रॅम्पवॉक, ‘मॅजिकल सायन्स’वर नृत्य आणि बल-ऊर्जेवरील प्रयोग सादर केले. विद्यार्थ्यांनी केवळ खाद्यसंस्कृतीच नव्हे, तर विविध देशांच्या परंपरा, पर्यटनस्थळे आणि डिजिटल माध्यमांमुळे पर्यटन क्षेत्रात येत असलेले बदल याबाबतही माहिती दिली.
प्राचार्य अन्वय चिकाटे यांनी पर्यटनाचे फायदे स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘‘पर्यटनामुळे विद्यार्थ्यांना विविध संस्कृती, परंपरा, भाषा आणि जीवनशैलीची ओळख होते, ज्यामुळे त्यांचा दृष्टिकोन व्यापक होतो.’’
कार्यक्रमासाठी उपप्राचार्या स्वाती नांगरे, प्रशासकीय व्यवस्थापक विशाल जाधव, कार्यक्रम समन्वयिका मेघा पवार, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

----------------------------------

02475
कोपर्डे हवेली : पोदार स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी विविध देशांची व राज्यांची खाद्यसंस्कृती, वेशभूषा, परंपरा यांचे सादरीकरण केले. त्याची पाहणी करताना मान्यवर. (जयंत पाटील : सकाळ छायाचित्रसेवा)
-------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com