डीएसपी मान्सून लीग क्रिकेट

डीएसपी मान्सून लीग क्रिकेट
Published on

फोटो ः दिग्विजय पांडे
दिग्विजय पांडेची अर्धशतकी खेळी
पुणे, ता. २९ ः डीएसपी स्पोर्ट्‌स अँड इव्हेंटस यांच्या वतीने आयोजित डीएसपी करंडक मिश्र कॉर्पोरेट मॉन्सून क्रिकेट लीगमध्ये दिग्विजय पांडेने केलेल्या (७९) अर्धशतकी खेळीच्या जोरावर साई सत्यम क्रिकेट क्लबने लेथल इलेव्हन संघाचा ८६ धावांनी पराभव केला.
वाघोली येथील पुणे क्रिकेट क्लब मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत प्रथम फलंदाजी करताना साई सत्यम क्लबने पाच बाद १९३ धावा केल्या. त्यात प्रमुख वाटा दिग्विजय पांडेने ४१ चेंडूंत आठ चौकार व सहा षटकारांसह केलेल्या ७९ धावांचा होता. त्याला विजयकुमार अय्यरने ३५ चेंडूंत पाच चौकार व दोन षटकारांसह ४९ धावांची खेळी करत सुरेख साथ दिली. पीयूष गंगवार व रौनकने प्रत्येकी दोन गडी बाद केले. प्रत्युत्तर देताना लेथल इलेव्हनचा डाव १०७ धावांत आटोपला. विजय पटेलने चार, मयूर मिस्त्रीने तीन, तर पवन आनंदने दोन गडी बाद केले. ‘सामनावीर’ हा मान दिग्विजय पांडेने मिळविला.
संक्षिप्त धावफलक ः
साई सत्यम क्लब- (२० षटकांत) ५ बाद १९३ (दिग्विजय पांडे ७९, विजयकुमार अय्यर ४९, पवन आनंद नाबाद २९, पीयूष गंगवार २-३०, रौनक २-३५) विजयी विरुद्ध लेथल इलेव्हन- (१५ षटकांत) सर्वबाद १०७ (विनायक २३, रघुनंदन नाथ १८, विजय पटेल ४-२२, मयूर मिस्त्री ३-१६, पवन आनंद २-३०).
-----------------------------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com