

दीक्षित नगरमधील मोकळ्या प्लॉटमध्ये
पाणी साचल्याने डासांचा प्रादुर्भाव
साचलेले पाणी काढून औषध फवारणीची मागणी
सोलापूर, ता. १२ : प्रभाग क्रमांक १९, झोन क्रमांक ४ मधील स्वागत नगर रोडवरील दीक्षित नगर परिसरातील मोकळ्या प्लॉटमध्ये पावसाचे पाणी साचल्याने डासांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे परिसरात अनारोग्यजन्य परिस्थिती निर्माण झाली असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
दीक्षित नगर परिसरातील काही प्लॉटधारकांनी गेल्या अनेक वर्षांपासून जागेवर कोणतेही बांधकाम केलेले नाही. त्यामुळे हे प्लॉट मोकळे व ओसाड अवस्थेत आहेत. पावसाळ्यात या प्लॉटमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचत असून, त्यातून डासांची उत्पत्ती होत आहे. तसेच परिसरात घाण, कचरा व दुर्गंधी पसरत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.
साचलेल्या पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच परिसरातील रहिवाशांना मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया यांसारख्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, संबंधित मोकळ्या प्लॉटधारकांवर कारवाई करून साचलेले पाणी काढण्याची मागणी होत आहे.
याबाबत दीक्षित नगरमधील रहिवाशांनी महापालिका प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. मोकळ्या प्लॉटची पाहणी करून साचलेले पाणी काढावे, परिसराची स्वच्छता करावी तसेच डास प्रतिबंधक औषधांची फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.