Pune Municipal School Condition
sakal
पुणे - छतावरील उचकटलेले पत्रे, पावसाच्या पाण्याची गळती, पापुद्रे आलेल्या भिंती आणि धोकादायक दगडी बांधकाम अशा जीवघेण्या स्थितीत शेकडो विद्यार्थी भविष्याची स्वप्ने पाटीवर गिरवत आहेत. ही स्थिती आहे महापालिकेच्या धायरी येथील वस्ताद हरिभाऊ दादा पोकळे माध्यमिक विद्यालयाची.
याचप्रमाणे महापालिकेच्या बहुतांश शाळांमध्ये तुटलेली-गंजलेली बाके, खराब स्वच्छतागृह व शौचालय, पापुद्रे आलेल्या भिंती, तुटलेल्या फरशा ‘सकाळ’ने केलेल्या पाहणीत दिसून आल्या. इतकेच नव्हे तर शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी शिक्षकांची संख्याही अपुरी असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.