पुणे महापालिकेच्या विरोधी पक्षनेते पदी दिलीप बराटे निश्‍चित

Barate-Dilip-Prabhakar.jpg
Barate-Dilip-Prabhakar.jpg

पुणे  : महापालिकेतील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गटनेते पदासाठी ज्येष्ठ नगरसेवक दिलीप बराटे यांचे नाव निश्‍चित झाले असून, त्यानुसार बराटे यांची विरोधी पक्ष नेतेपदी निवड होईल. पक्षाच्या नगरसेवकांच्या बैठकीत बराटे यांच्या नावाला पसंती मिळाली. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत अधिकृत घोषणा होईल. 

महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांच्याकडे शहराध्यक्षपदाची जबाबदार सोपविण्यात आल्याने विरोधी पक्ष नेतेपद बदलण्याची चर्चा होती. त्यानुसार बराटे यांचा अनुभव लक्षात घेऊन बराटे यांच्या नावाला प्राधान्य दिल्याचे सांगण्यात आले. कर्वेनगर परिसरातून बराटे हे तीन वेळा निवडून आले आहेत. याआधी त्यांनी उपमहापौर पद भूषविले असून, खडकवासल्यातून विधानसभेची निवडणूक लढविली होती. हे पद मिळविण्यासाठी ज्येष्ठ आणि अनुभवी नगरसेवकांनी "फिल्डिंग' लावली आहे.

माजी महापौर दत्तात्रेय धनकवडे यांच्यासह ज्येष्ठ नगरसेवक दिलीप बराटे, बाबुराव चांदरे, विशाल तांबे यांची नावे चर्चेत होती, माजी महापौर वैशाली बनकर, स्थायी समितीच्या माजी अध्यक्ष अश्‍विनी कदम, नगरसेविका नंदा लोणकर या महिला नेत्याही विरोधी पक्ष नेतेपदाच्या शर्यतीत होत्या. मात्र नेतृत्वाने बराटे यांचे नाव निश्‍चित केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com