आसू - महाराजा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या अध्यक्षपदी दिलीपसिंह भोसले यांची चौथ्यांदा,तर उपाध्यक्षपदी रणजितसिंह भोसले यांची बिनविरोध निवड झाली

आसू - महाराजा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या अध्यक्षपदी दिलीपसिंह भोसले यांची चौथ्यांदा,तर उपाध्यक्षपदी रणजितसिंह भोसले यांची बिनविरोध निवड झाली

Published on

महाराजा सोसायटीची अध्यक्षपदी दिलीपसिंह भोसले

निवडणूक बिनविरोध; रणजितसिंह भोसले उपाध्यक्षपदी

आसू, ता. २० : महाराजा मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या अध्यक्षपदी दिलीपसिंह भोसले यांची चौथ्यांदा, तर उपाध्यक्षपदी रणजितसिंह भोसले यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध पार पडली होती.
महाराजा मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदांची निवड नुकतीच पार पडली. त्यात अध्यक्षपदी दिलीपसिंह भोसले यांची चौथ्यांदा, तर उपाध्यक्षपदी रणजितसिंह भोसले यांची बिनविरोध निवड झाली. या वेळी संचालक अ‍ॅड. मधुबाला भोसले, प्रियदर्शनी भोसले, अमोल सस्ते, हेमंत फुले, तुषार गांधी, दीपराज तावरे, कुमार भट्टड, डॉ. विलास रसाळ, सुभाष आढाव उपस्थित होते.
महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यात विस्तारलेल्या, सुमारे पाच हजार सभासद व सुमारे ८०० कोटींची आर्थिक उलाढाल असलेल्या महाराजा मल्टिस्टेटला विद्यमान अध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांनी पारदर्शक कारभार, काटकसर, सभासदांचे व ठेवीदाराचे हित जोपासत प्रगतिपथावर नेऊन ठेवले आहे. जनरल मॅनेजर संदीप जगताप यांनी उपस्थितांचे स्वागत व आभार मानले.

फोटो -दिलीपसिंह भोसले 02645
रणजितसिंह भोसले 02646

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com