Maharashtra Irrigation Policy: अहिल्यानगरला पाणी देण्यास विरोध नाही; बोगद्याऐवजी डिंभे धरणाचा डावा कालवा सक्षम करण्याची दिलीप वळसे पाटील यांची मागणी

डिंभे धरणाचा डावा कालवा दुरुस्त करून वहनक्षमता वाढविल्यास कमी खर्चात अहिल्यानगरला पाणीपुरवठा शक्य; बोगद्याऐवजी पर्यायाचा शासनाने गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी
Dilip Walse Patil Demands Strengthening of Dimbhe Left Canal Instead of Tunnel

Dilip Walse Patil Demands Strengthening of Dimbhe Left Canal Instead of Tunnel

Sakal

Updated on: 

मंचर : ‘‘अहिल्यानगर जिल्ह्याला पाणी देण्यास माझा विरोध नाही. मी स्वतः दहा वर्षे नगर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम केले आहे. मात्र, डिंभे धरणाचा डावा कालवा दुरुस्त करून त्याची वहनक्षमता वाढविली, तर अंदाजे २०० ते ३०० कोटी रुपये खर्चात डिंभे धरणातून अहिल्यानगर जिल्ह्याला पाणी देता येऊ शकते. त्यामुळे बोगदा करण्याऐवजी डावा कालवा दुरुस्त व सक्षम करण्याचा पर्याय शासनाने गांभीर्याने विचारात घ्यावा,’’ अशी भूमिका माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शनिवारी (ता. २६) मंचर येथे पत्रकार परिषदेत मांडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com