
मंचर : ‘‘ज्येष्ठ नेते शरद पवार देशातील मोठे नेते आहेत. खरंतर राजकारणात सुसंस्कृतपणा असावा लागतो. त्यांच्यावर अशा प्रकारची टीका करणे योग्य नाही. या पुढील काळात सामंजस्याने समजून घेऊन बोललं पाहिजे,’’ असा सल्ला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, आमदार दिलीप वळसे पाटील यांनी आमदार गोपीचंद पडळकर व आमदार सदाभाऊ खोत यांना दिला.