

Dimba Dam temporary settlers get relief after NCP intervention
Sakal
घोडेगाव : डिंभा धरण परिसरातील जलसंपदा विभागाच्या जागेत तात्पुरता निवारा करून राहणाऱ्या बांधवांना कार्यकारी अभियंता डिंभा धरण उपविभागाचा तात्पुरता दिलासा मिळाला आहे. तात्पुरता निवारा करून राहणाऱ्या कातकरी-ठाकर तसेच डिंभा लेबर कॉलनी येथे अनेक वर्षांपासून राहणाऱ्या बांधवांवर कारवाई करणार नसल्याचे कार्यकारी अभियंता डिंभा उपविभाग यांचे उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सांगितले. मात्र कायमस्वरूपी निवारा करण्यासाठी किती वेळ लागणार याबाबत लेखी उत्तर देण्याचे मात्र त्यांनी टाळले.