

पारगाव, ता. ११ : डिंभे-माणिकडोह बोगद्यासंदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची पुणे येथे भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. हा बोगदा आंबेगाव, शिरूर व जुन्नर तालुक्यावर अन्याय करणारा असल्याने यासंदर्भात आपण लक्ष घालावे, अशी मागणी निकम यांनी या वेळी केली.
निकम यांनी शुक्रवारी (ता. ११) सकाळी पुण्यात पवार यांची भेट घेतली. यावेळी भरत म्हस्के, तेजस जाधव, विशाल वाबळे आदी उपस्थित होते. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान राज्य सरकारने कुकडी पाटबंधारे प्रकल्पाच्या कामासाठी चौथी प्रशासकीय मान्यता देण्यात आली. यामध्ये समावेश केलेल्या डिंभे-माणिकडोह बोगद्यामुळे आंबेगाव, शिरूर व जुन्नर तालुक्यातील नागरिकांवर अन्याय होणार असल्याबाबत सविस्तर माहिती निकम यांनी दिली. तसेच, जोपर्यंत कुकडी प्रकल्पामध्ये आदिवासी भागातील उपसा सिंचन योजना, कळमोडी प्रकल्प, म्हाळसाकांत योजना, थिटेवाडी धरण आदी महत्त्वाच्या प्रकल्पांचा समावेश होत नाही, तोपर्यंत डिंभे धरणाच्या पाण्याला धक्का लागू दिला जाणार नाही, असे सांगून या प्रलंबित प्रकल्पांमुळे आंबेगाव-शिरूर मतदारसंघातील शेतकरी, आदिवासी बांधव, तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोठा फायदा होऊ शकतो. त्यामुळे प्रलंबित योजनांना गती मिळावी आणि संबंधित प्रश्न मार्गी लागावेत, यासाठी आपण लक्ष घालावे, अशी मागणी पवार यांच्याकडे केली.
डिंभे-माणिकडोह बोगदा कायमचा रद्द करावा, यासाठी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या घरासमोर लवकरच तालुक्यातील शेतकऱ्यांना बरोबर घेऊन आंदोलन करणार असल्याचेही निकम यांनी पवार यांना सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.