The right-bank canal is overgrown with trees and shrubs, filled with trash, and has run dry due to a lack of water.
sakal
मंचर - हुतात्मा बाबू गेनू सागर (डिंभे धरण) ९९.८ टक्के भरलेले असतानाही गेल्या तीन महिन्यांपासून उजव्या कालव्याला पाणी सोडण्यात आलेले नाही. त्यामुळे आंबेगाव व शिरूर तालुक्यांतील ४५ गावे व ९० वाड्या-वस्त्यांमधील शेतकऱ्यांची उभी पिके पाण्याअभावी करपू लागली आहेत. धरणात मुबलक पाणीसाठा असतानाही कालवा कोरडा असल्याने शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही काही भागांत गंभीर होण्याची भीती निर्माण झाली आहे.