Dinanath Mangeshkar Hospital Case : भिसे यांच्या नातेवाईकांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; मुख्यमंत्र्यांनी दिले कडक कारवाईचे आश्वासन

दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दाखल करून न घेतल्याने तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला होता.
CM devendra fadnavis and amit gorkhe
CM devendra fadnavis and amit gorkhesakal
Updated on

पुणे - दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दाखल करून न घेतल्याने तनिषा भिसे यांचा मृत्यू झाल्या प्रकरणी भिसे यांच्या नातेवाईकांनी शनिवारी (ता. ५) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. 'ज्या डॉक्टरांनी हलगर्जीपणा केला असेल त्यांच्यावर कडक कारवाई करू,' असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नातेवाईकांना आश्वासन दिले असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

एका कार्यक्रमा निमित्ताने फडणवीस बालेवाडी येथे आले होते, त्यावेळी नातेवाईकांनी भेट घेतली. यावेळी आमदार अमित गोरखे, सुशांत भिसे यांची बहीण प्रियंका पाटे, दाजी अक्षय पाटे आणि मावशी योगिता बढे उपस्थित होते.

प्रियांका पाटे म्हणाल्या, 'ज्या डॉक्टरांनी त्रास दिला त्या डॉक्टरवर कारवाई झाली पाहिजे. आमच्या वहिनी सोबत जे झाले ते इतर कोणासोबत होऊ नये. अशी आमची मागणी आहे मुख्यमंत्री आम्हाला न्याय देतील असा विश्वास आहे.'

तर फडणवीस याबाबत पत्रकारांशी बोलताना म्हणाले, 'भविष्यात अशा गोष्टी घडू नये यासाठी प्रयत्न केले जातील. सगळ्याच गोष्टी हॉस्पिटलच्या चूक आहे अस नाही, पण कालची घटना चुकीची होती. जे चुकीचे आहे ते चुकीचंच आहे, पण आज त्यांनी पत्र काढून काही निर्णय घेतला असेल तर त्याचा मला आनंद आहे. काल आणि आज अनेक आंदोलन झाले आहे त्यामुळे कोणीही शोबाजी करू नये. रुग्णालयाच्या बाबतीत अहवाल येईपर्यंत गुन्हा दाखल केला जाऊ शकत नाही, त्यानंतर निर्णय घेतला जाईल.'

धर्मादाय आयुक्तायाकडील सर्व बाबी ऑनलाइन

'धर्मादाय आयुक्ताकडील सर्व गोष्टी एकाच डॅशबोर्डखाली आणण्याचा प्रयत्न आहे. आपण सगळ ऑनलान आणणार आहे.मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षही त्याला जोडण्याचा प्रयत्न आहे,' असेही फडणवीस म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com