Sarika Hargude
Sarika Hargudesakal

Wagholi News : महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाच्या संचालकपदी सारीका हरगुडे यांची बिनविरोध निवड

महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाच्या संचालकपदी केसनंद येथील संचालिका सारिका हरगुडे यांची बिनविरोध निवड झाली.

वाघोली - महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाच्या संचालकपदी केसनंद येथील संचालिका सारिका हरगुडे यांची बिनविरोध निवड झाली.

राज्यस्तरीय शिखर संस्थेच्या संचालक मंडळात रायगड/ठाणे व महिला प्रवर्गातील एक जागा रिक्त होती. त्याकरिता राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाची निवडणूक घेतली. निवडणूक अधिकारी म्हणून दिग्विजय आहेर यांनी काम पाहीले.

या निवडणूकीत पुणे बाजार समितीच्या संचालिका सारीका हरगुडे यांचा महिला प्रवर्गात एकमेव अर्ज आल्याने व अर्ज वैध ठरल्याने त्यांची महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघावर संचालक म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी संघाचे सभापती बाळासाहेब नाहाटा, उपसभापती संतोष सोमवंशी, संघाचे संचालक अशोकराव डक, माजी आमदार केशवराव मानकर, संघाचे सर्व संचालक तसेच संघाचे कार्यकारी संचालक किशोर कुलकर्णी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com