आयटीआय विद्यार्थ्यी आता घरी बसूनच गिरविणार धडे ; नवे यू-ट्यूब चॅनेल सुरु

The Directorate of Business Education and Training launches a You Tube channel for ITI student to learn at home
The Directorate of Business Education and Training launches a You Tube channel for ITI student to learn at home
Updated on

पुणे : महाराष्ट्रात लॉकडाऊन असल्याने विद्यार्थ्यांना घरी बसून शिक्षण घेता यावे म्हणून व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने आयटीआय विद्यार्थ्यांसाठी यू-ट्यूब चॅनेल सुरू केले आहे. त्यावरील व्हिडिओच्या मदतीने विद्यार्थी धडे गिरवत आहेत.
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयांनी ई-शिक्षणावर भर दिला आहे. त्यात व्यवसाय शिक्षण विभाग मागे नसून विद्यार्थ्यांनाद्वारे ई-लर्निंग शिकविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे यू-ट्यूब चॅनेलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना घरून अभ्यास तसेच कोणतीही समस्या सोडविता येईल.

ई-व्याख्यान, चर्चासत्रे
संचालनालयाच्या 'डीव्हीईटी ई लर्निंग' या चॅनेलवर आयटीआयचा प्रत्येक शिक्षक आपल्या विषयाचा (ट्रेड) व्हिडिओ तयार करताे आणि तो संचालनालयाकडे पाठविताे. त्यानंतर हे व्हिडिओ संचालकांद्वारे चॅनेलवर अपलोड केले जाते. यात ई-लेक्चर, सेमिनार, गेस्ट लेक्चर यांचा समावेश आहे. 

इंग्रजी आणि मराठी या दोन्ही माध्यमांमध्ये व्हिडिओ असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यास करणे सोपे होईल. त्याचबरोबर अभ्यासक्रमाशी संबंधित इतर व्हिडिओचा विद्यार्थ्यांना अधिक फायदा होईल. संचालनालयाकडून  या चॅनलवर आतापर्यंत विविध विषयांचे (ट्रेड) दीडशेहून अधिक व्हिडिओ पोस्ट केले आहेत. सुमारे पन्नास हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी त्याचा वापर केला आहे. 

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे सहसंचालक योगेश पाटील म्हणाले, "यूट्यूब चॅनेलवर असलेल्या व्हिडिओमध्ये कोर्सचे नाव आणि विषय याची माहिती असल्याने आवश्यक व्हिडिओ विद्यार्थ्यांना शोधणे  सोपे होईल. तसेच त्यांच्या अभ्यासातही खंड पडणार नाही. यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसानही टळेल."

परीक्षा लांबणीवर
आयटीआयच्या परीक्षा दरवर्षी जुलैच्या अखेरीस होतात. या वर्षी त्या एक महिना पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे. दरम्यानच्या काळात विद्यार्थी अभ्यासापासून दूर राहू नये म्हणून झूम आणि मायक्रोसॉफ्ट टीम या अॅपद्वारे विद्यार्थ्यांचे ऑनलाइन वर्ग घेण्याच्या सूचना शिक्षकांना केल्या आहेत, असे योगेश पाटील यांनी 'सकाळ'ला सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com