Pension
sakal
मंचर - आंबेगाव तालुक्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजना, दिव्यांग पेन्शन योजना तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेंतर्गत नव्याने लाभ मंजूर झालेल्या दिव्यांग, निराधार, घटस्फोटित आणि वृद्ध लाभार्थ्यांना गेल्या तीन महिन्यांपासून पेन्शन मिळालेली नाही. त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी असून, प्रलंबित पेन्शन तातडीने जमा न केल्यास घोडेगाव तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा आंबेगाव तालुका दिव्यांग संघटनेने दिला आहे.