
विश्रांतवाडी : समांतर आरक्षणाचा निर्णय रद्द करून राज्यभरातील सर्व वसतिगृहांत दिव्यांग आरक्षण लागू करावे या मागणीसाठी दिव्यांग विद्यार्थ्यांनी शुक्रवारी विश्रांतवाडी येथील सामाजिक न्याय विभागाच्या सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, पुणे यांच्या कार्यालय परिसरात आंदोलन केले.