Disaster Management : आपत्ती निवारणासाठी आपदा मित्र प्रशिक्षण

आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने 50 युवकांना आंबेगाव तालुक्यातील डिंभे येथे आपदा मित्र म्हणून प्रशिक्षण दिले
Disaster Management : आपत्ती निवारणासाठी आपदा मित्र प्रशिक्षण

शिनोली : पुणे जिल्हयात कुठेही आपत्तीची परिस्थिती निर्माण झाल्यास यामध्ये लोकांना मदत करता यावी यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने 50 युवकांना आंबेगाव तालुक्यातील डिंभे (ता. आंबेगाव) येथे आपदा मित्र म्हणून प्रशिक्षण दिले जात आहे.

हे प्रशिक्षण राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नवी दिल्ली, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांच्या व्दारे आयोजीत करण्यात आले असून पुणे जिल्हयाची सुरवात डिंभे येथून करण्यात आली आहे. या प्रषिक्षण शिबीराचा शुभारंभ प्रांत अधिकारी सारंग कोडोलकर यांच्या हस्ते झाले. यावेळी कर्नल स्वप्नेकर, आपत्ती व्यवस्थापन विभाग प्रमुख विठ्ठल बोणवटे, निसर्ग साहस संस्थेचे धनंजय कोकणे, महाराष्ट्र आरोग्य मंडळाचे सुरेश काळे इत्यादी उपस्थित होते.

या प्रशिक्षणात भुकूंप, त्सुनामी, महापूर, बाॅग्बस्फोट, रस्ते अपघात, जंगली प्राण्यांचे रेस्क्यु इत्यादी विषयावर सविस्तर माहिती व बचाव करण्यासाठीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. भविष्यात आपदा मित्रची जबाबदारी महत्वाची रहणार आहे यासाठी सर्व प्रशिक्षणार्थींनी व्यवस्थीत प्रशिक्षण घ्या असे सारंग कोडोलकर यांनी सांगितले.

यावेळी प्रांत अधिकारी यांनी प्रशिक्षणार्थींच्या सुचना व अडचणी समजून घेतल्या. हे प्रशिक्षण पुर्ण झाल्यानंतर वेळोवेळी सराव शिबीर होणे आवश्यक आहे. रेस्क्युसाठी लाईफ जॅकेट, पाण्यातील बोट व इतर साहित्य मिळावे, पाण्यात बुडण्याच्या अनेक घटना घडत असतात यासाठी स्क्युबा डायविंगचे प्रशिक्षण मिळावे. डोंगरद-यांमध्ये जाण्यासाठी दुचाकी रूग्णवाहिका असावी अशा अनेक सुचना यावेळी प्रशिक्षणार्थीनी केल्या.

पुणे जिल्हयात मार्च 2023 पर्यंत हि प्रशिक्षणे होणार असून यातून पाच हजार आपदा मित्र पुणे जिल्हयात तयार केले जाणार आहेत. प्रशिक्षण पुर्ण केल्या नंतर प्रमाणपत्र व पाच लाखांचा अपघात विमा, रेक्स्यु बॅग, आपदा मित्र म्हणून ओळखपत्र दिले जाणार असल्याचे विठ्ठल बोनवटे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com