यशस्वी व्हायचे असेल तर आयुष्य शिस्तीत जगा!: आय.आर.एस. अमरनाथ खुळे ;टेंभुर्णीत माढा तालुका प्रशासकीय अधिकारी व मित्रपरिवाराचा स्नेहमेळावा, गुणवंतांचा सन्मान व मार्गदर्शन शिबिर उत्साहात

यशस्वी व्हायचे असेल तर आयुष्य शिस्तीत जगा!: आय.आर.एस. अमरनाथ खुळे ;टेंभुर्णीत माढा तालुका प्रशासकीय अधिकारी व मित्रपरिवाराचा स्नेहमेळावा, गुणवंतांचा सन्मान व मार्गदर्शन शिबिर उत्साहात
Published on: 

यशासाठी शिस्त, सातत्य अन् मेहनत आवश्यक
अमरनाथ खुळे; टेंभुर्णीत प्रशासकीय अधिकारी अन् मित्रपरिवाराचा स्नेहमेळावा

सकाळ वृत्तसेवा
भीमानगर, ता. १६ : आयुष्यात यशस्वी होण्यासाठी केवळ बुद्धिमत्ता पुरेशी नसून त्याला शिस्त, सातत्य, मेहनत आणि ध्येयाप्रति समर्पणाची जोड आवश्यक आहे. त्यामुळे यशस्वी व्हायचे असेल तर प्रत्येकाने आयुष्य शिस्तीत जगले पाहिजे, असा कानमंत्र आयआरएस अधिकारी अमरनाथ खुळे यांनी दिला.
टेंभुर्णी (ता. माढा) येथील रोटरी क्लबमध्ये माढा तालुका प्रशासकीय अधिकारी व मित्रपरिवाराच्या वतीने आयोजित स्नेहमेळावा, सन्मान सोहळा व मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते. प्रशासकीय सेवेत कार्यरत अधिकारी, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी आणि विविध क्षेत्रांतील व्यक्तींना एकत्र आणण्याच्या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत स्पर्धा परीक्षांची तयारी, प्रशासकीय सेवेतील संधी व स्वतःच्या अनुभवांची माहिती दिली. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश मिळविलेल्या गुणवंतांचा सन्मानही करण्यात आला.
---------------------------------
स्पर्धा परीक्षांसाठी पुस्तकांचे प्रकाशन
विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी समाधान कोकाटे लिखित ‘राज्यघटना’ (पॉलिटी) आणि ज्ञानज्योत ॲकॅडमीचे संचालक अजित चंदनकर लिखित ‘मराठी व्याकरण’ या पुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी मंत्रालयाच्या उपसचिव नंदा खुळे-जाधव, जिल्हा कृषी अधिकारी प्रवीण चोपडे, विभागीय पोलिस अधिकारी स्वप्निल पाटील यांच्यासह विविध विभागांतील अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन रंगनाथ भुजबळ यांनी केले, तर लेशपाल जवळगे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.