गुरूवाणी

गुरूवाणी
Published on

गुरुदेवांप्रती कृतज्ञता व्यक्त करा

तप करणे आव्हानात्मक असले, तरी तीर्थंकरांची कृपा असल्यावर ते शक्य होते. गुरुदेवांच्या जन्मोत्सवात अनेकांना तप करता आले नाही, कारण तीर्थंकरांची कृपा ते ग्रहण करू शकले नाहीत. ज्यांनी उपवास केले, त्यांच्यावर कृपा झाली आहे. जितक्या श्रद्धेने अट्ठाई केली तितक्याच श्रद्धेने पारणा केला पाहिजे. अंतर्मनात अशी शक्ती जागृत करा की, पुढच्या वर्षी सुद्धा असेच तप करण्याचा दृढ संकल्प होईल. श्रद्धेने उपवास तप केले, तर अनेक समस्यांचे निराकरण होते. अनेक तपस्वींना शारीरिक व्याधी होत्या, पण त्यांनी गुरुदेवांवर श्रद्धा ठेवून तप केले. परिणामी त्यांना कोणताच त्रास झाला नाही. ही ताकद दृढ संकल्प आणि गुरुदेवांच्या भक्तीत असते. उपवास करताना अनेक सकारात्मक विचार मनात आले असतील. तपासाठी कोणाकडून प्रेरणा मिळाली असेल.‌ पारणा करताना त्या सगळ्या गोष्टींचे मुद्दाम स्मरण करावे. तीर्थंकर परमात्म्याचे स्मरण करा. ज्यावेळी तुम्ही तपस्या सुरू केली. तुमची उत्कट भावना होती की, काहीही झाले तरी मला तपस्या पूर्ण करायची आहे. तेव्हा तुमच्या मनात गुरुभक्ती जागृत झाली. ही भक्ती जन्मोजन्मी जागृत राहण्याची मनोकामना करा. तपस्येमुळे मनातील नकारात्मकता नाहीशी होते. पाप कर्माची निर्जरा तप साधनेतून होते. तपस्या काळात मनात नकारात्मक विचार आले असतील, कधी पोट दुखले असेल, पित्त वाढले असेल. हे सर्व तुमच्या जुन्या कर्माची निर्जरा होती. तीर्थंकर परमात्म्याला प्रार्थना करा, ‘भविष्यात जेव्हा साधना करेल तेव्हा माझ्या मनात असे नकारात्मक विचार येणार नाही, अशी कृपा माझ्यावर व्हावी.’ तपस्येदरम्यान कोणती इच्छा निर्माण झाली, माझी कोणी तरी सेवा केली पाहिजे, अशी अभिलाषा जागृत झाली. या सगळ्या गोष्टी आठवा आणि तीर्थंकर परमात्मा आणि गुरुदेवांना निवेदन करा, ‘जे माझ्या मनात चुकीच्या गोष्टी आल्या, त्यासाठी मला क्षमा करा.‌’ ज्यांनी तपस्यादरम्यान सेवा केली त्यांना धन्यवाद द्या. समर्पण चातुर्मास कमिटी, चातुर्मास लाभार्थी बोरा परिवार, डॉक्टर या सर्वांना धन्यवाद द्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com