शेतकरी हाच केंद्रबिंदू

गजेंद्र बडे
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीच्या सभापतिपदी नुकतीच बाबूराव वायकर यांची निवड झाली आहे. पुणे हा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचा जिल्हा आहे. त्यामुळे शेती आणि शेतीपूरक व्यवसायासाठी उपयुक्त असलेल्या योजनांची आखणी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीच्या सभापतिपदी नुकतीच बाबूराव वायकर यांची निवड झाली आहे. पुणे हा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचा जिल्हा आहे. त्यामुळे शेती आणि शेतीपूरक व्यवसायासाठी उपयुक्त असलेल्या योजनांची आखणी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रश्‍न - योजनांबाबत भूमिका काय असेल? 
वायकर ः जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागामार्फत राबविली जाणारी प्रत्येक योजना ही शेतकरी हाच केंद्रबिंदू मानून तिची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल. 

प्रश्‍न - कोणत्या नवीन योजना सुरू करणार आहात?  
- सभापतिपदाचा पदभार घेऊन दोनच आठवडे लोटले आहेत. या कालावधीत कृषी आणि पशुसंवर्धन समितीची प्रत्येकी एक मासिक सभा झाली. त्यात शेतकऱ्यांना उपयुक्त ठरू शकणाऱ्या आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी फायदेशीर ठरू शकणाऱ्या नवीन तीन योजना मंजूर केल्या आहेत. अपघाती मृत्यू आलेल्या जनावरांसाठी नुकसान भरपाई, नवीन बैलजोडी खरेदी करण्यासाठी ७५ टक्के अनुदान आणि शेतकऱ्यांसाठी परराज्यात अभ्यास दौऱ्याचे आयोजन करणे यांचा समावेश आहे.

प्रश्‍न - जुन्या योजनांमध्ये सुधारणा करणार आहात का? 
- सध्या विधवा, परितक्ता शेतकरी महिलांसाठी पाच हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याची योजना कार्यरत आहे. योजना चांगली आहे. परंतु, निधीची कमतरता आणि संबंधित महिलेच्या नावावर सातबारा असण्याचे बंधन असल्याने, अनेक पात्र महिला लाभापासून वंचित आहेत. त्यामुळे या योजनेत सुधारणा करून नावावरील सातबाराच्या निकषात दुरुस्ती केली जाणार आहे. तसेच सेंद्रिय शेती योजनेबरोबरच व्यक्तिगत लाभाच्या योजनांसाठी भरीव तरतूद केली जाईल. योजनांची जनजागृती केली जाणार आहे. 
(उद्याच्या अंकात - महिला व बालकल्याण सभापती पूजा पारगे) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: discussion with baburao waykar