बारामतीत युवा अधिकाऱ्यांच्या समाजमनाची दिवाळी 

youth baramati
youth baramati

भवानीनगर (पुणे) : बारामती व इंदापूर तालुक्‍यातील प्रशासकीय अधिकारी बनलेल्या 60 जणांनी "आपली माणसं, आपली बारामती' या ग्रुपच्या माध्यमातून सलग दुसऱ्या वर्षी दिवाळीचा सण बारामतीत एकत्रित साजरा केला! या वेळी सामाजिक हित डोळ्यासमोर ठेवून प्रशासकीय कामकाजातील माहितीच्या देवाणघेवाणीबरोबरच समाजहितासाठी करावयाच्या सामाजिक उपक्रमांची एकमेकांशी चर्चा केली. 

राज्य लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून प्रशासकीय अधिकारी बनलेल्या इंदापूर व बारामतीच्या परिसरातील सुपुत्रांनी "आपली माणसं, आपली बारामती' या ग्रुपच्या माध्यमातून एकत्रित येऊन गेल्या वर्षीपासून "समाजमनाची दिवाळी' साजरी करण्यास सुरवात केली. या वर्षीही महाराष्ट्रभर विविध भागांत कार्यरत असलेले 60 अधिकारी लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी बारामतीत एकत्रित आले व सामाजिक हित डोळ्यासमोर ठेवून प्रशासकीय कामकाजातील माहितीच्या देवाणघेवाणीबरोबरच समाजहितासाठी करावयाच्या सामाजिक उपक्रमांची एकमेकांशी चर्चा केली. 

या कार्यक्रमात बारामती परिसरातील विविध सामाजिक कामांवरही या अधिकाऱ्यांनी चर्चा केली. या आगळ्यावेगळ्या दिवाळी चर्चेत पोलिस दल, महसूल, जीएसटी, मंत्रालय, वन, परिवहन विभाग, नगरविकास, ग्रामविकास आदी शासकीय खात्यांमध्ये कार्यरत असलेले युवा अधिकारी सहभागी झाले होते. वन अधिकारी हनुमंत जाधव, नायब तहसीलदार तुषार बोरकर, कृषी अधिकारी दीपक गरगडे, गणेश गुरव आदींनी यासाठी पुढाकार घेतला होता. 

रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुणांमध्ये स्पर्धा परीक्षेव्यतिरिक्त इतरही क्षेत्रातील संधींबाबत जनजागृती करण्याचे, प्रशासकीय सेवेतून थोडा वेळ काढून या भागातील शालेय विद्यार्थ्यांना मूल्य शिक्षणासाठी प्रयत्न करायचा, परिसरातील नैसर्गिक आपत्तीबरोबर महिलांच्या आरोग्य सुविधांवर भर देण्याचा या वर्षात आम्ही संकल्प केला आहे. 
- तुषार बोरकर, नायब तहसीलदार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com