

वालचंदनगर, ता. ४ : कळस (ता. इंदापूर) येथील जयहिंद फिड्स (सध्याची नेचर डिलाईट कॅटल फीड प्रा.लि) या कंपनीला पशुखाद्याच्या उधारीपोटी दिलेला धनादेश अनादरित (न वटल्यामुळे) झाल्याप्रकरणी मोरगाव (ता. बारामती) येथील ‘मोरया मिल्क एंटरप्रायझेस’च्या मालक शीतल ज्ञानदेव तावरे यांना सहा महिन्यांचा साधा कारावास व ६ लाख ७७ हजार १७६ रुपयांचा दंड तीस दिवसांच्या आतमध्ये देण्याचा निकाल बारामती सत्र न्यायालयाने दिला.
जयहिंद फिड्स कंपनी व मोरया मिल्क एंटरप्रायझेस डेअरी यांच्यामध्ये पशुखाद्याचा व्यवहार होत होता. जयहिंद फिड्स यांच्याकडून मोरया मिल्क एंटरप्रायझेस यांनी २९ फेब्रुवारी २०२० ते १२ डिसेंबर २०२० पर्यंत १४ लाख ४८ हजार ८२० रुपये रुपयांचे पशुखाद्य उधारीवरती घेतले होते. यातील ११ लाख १० हजार २३२ रुपये दिले होते. मात्र, ३ लाख ३८ हजार ५८८ रुपये देणे बाकी असल्यामुळे मोरया मिल्क एंटरप्रायझेस यांनी २९ जानेवारी २०२२ बॅंक ऑफ बडोदाच्या बारामती शाखेचा ३ लाख ३८ हजार ५८८ रुपयांचा धनादेश जयहिंद फिड्स यांना दिला. तो धनादेश जयहिंद फिड्स यांनी २० एप्रिल २०२२ रोजी बॅंकेमध्ये जमा केला. मात्र, पुरेसा निधी नसल्यामुळे तो २२ एप्रिल २०२२ रोजी अनादर झाला. ‘जयहिंद फिड्स’ने २९ एप्रिल ला मोरया मिल्क एंटरप्रायझेस यांना डिमांड नोटीस पाठवली. मात्र, त्यांनी डिमांड नोटीस घेण्यास नकार दिला. त्यामुळे ‘जयहिंद फिड्स’ यांनी ‘निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्ट’च्या (परक्राम्य संलेख अधिनियम १८८१ च्या कलम १३८ नुसार) न्यायालयात धाव घेऊन बारामती न्यायालयामध्ये खटला दाखल केला. न्यायालयामध्ये अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी प्रीतेश भंडारी यांच्या समोर खटल्याची सुनावणी झाली. जयहिंद फिड्स तर्फे ॲड. शुभम निंबाळकर, ॲड. सागर सोनवणे व जयहिंद फिड्स कंपनीचे प्रतिनिधी राजेंद्र सपकळ यांनी न्यायालयामध्ये पुरावे सादर केले. मोरया
मिल्क एंटरप्रायझेसच्या वतीने बचाव करण्यात आला. मात्र, ते न्यायालयात सिद्ध करू शकले नाहीत. सर्व पुरावे लक्षात घेता बारामती येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी प्रीतेश भंडारी यांनी सोमवारी (ता. २) मोरया मिल्क एंटरप्रायझेसला दोषी ठरवले. न्यायालयाने धनादेशाच्या दुप्पट रक्कम म्हणजे ६ लाख ७७ हजार १७६ रक्कम ‘जयहिंद फिड्स’ला देण्याचा आदेश देऊन सहा महिने साध्या कारावासाची शिक्षा देखील ठोठवली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.