
सिंहगड किल्ल्यावर लावलेल्या शिलालेखावरून वाद; संभाजी ब्रिगेड आक्रमक
पुणे : पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर (Sinhagad fort) लावलेल्या शिलालेखावरून नवीन वाद निर्माण झाला आहे. या गडावर तानाजी मालुसरे यांच्या घटनेआधी कोंढाण्याचे नाव सिंहगडच होते, असा उल्लेख शिलालेखात केला आहे. यामुळे सिंहगड किल्ल्यावर लावलेला शिलालेख काढा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने (Sambhaji Brigade) केली आहे. (Dispute over inscription on Sinhagad fort)
सिंहगड किल्ल्यावर (Sinhagad fort) तानाजी मालुसरे यांच्या घटनेआधी कोंढाण्याचे नाव सिंहगडच होते, असा उल्लेख शिलालेखात केला आहे. सिंहगड किल्ल्याच्या नावावरून सुरू असलेल्या वादावर तसेच खोट्या इतिहासावर संभाजी ब्रिगेड आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. यातूनच हा शिलालेख खोटा असल्याचा दावा संभाजी ब्रिगेडने (Sambhaji Brigade) केला आहे.
हेही वाचा: असदुद्दीन ओवैसी संतापले; म्हणाले, काहीही करा, ज्ञानवापी मशीदच राहील
सिंहगडावरील शिलालेखावर संभाजी ब्रिगेडने आक्षेप घेतला आहे. हा शिलालेख खोटा आहे. खोट्या इतिहासाचे दाखले देऊन शिलालेख लावल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष उत्तम कामठे यांनी केला. युद्धात तानाजी मालुसरे धारातीर्थी पडल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी कोंढाणा या गडाला सिंहगड असे नाव दिल्याचे त्यांनी सांगितले.
तानाजी मालुसरे यांच्या मृत्यूनंतर ‘गड आला पण सिंह गेला’ असे शिवाजी महाराज म्हणाले होते. हा इतिहास सर्वांना माहिती आहे. अलीकडच्या काळात सिंहगडावरील तानाजी मालुसरे यांच्या समाधीचे सुशोभीकरण झाले. यावेळी पुणे महापालिकेने काही शिलालेख लावले. यातीलच एका शिलालेखात ‘एक गड आला आणि एक गड गेला’ असे शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हटल्याचा उल्लेख केला आहे. मात्र, महाराजांनी असे म्हटलेच नाही, असे संभाजी ब्रिगेडने (Sambhaji Brigade) सांगितले.
Web Title: Dispute Over Inscription On Sinhagad Fort Sambhaji Brigade Offensive
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..