Pune News : मैत्रिणीच्या सततच्या छळाला कंटाळून तरुणाने संपविले जीवन
Pune Updates : मैत्रिणीच्या सततच्या त्रासाला कंटाळून तरुणाने नवले पुलाजवळ लॉजमध्ये आत्महत्या केली असून, तिच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे : मैत्रिणीकडून सातत्याने होणाऱ्या छळास कंटाळून तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ३० एप्रिल रोजी नवले पुलाजवळील एका लॉजमध्ये घडली.