‘टीईटी’चे १७७८ अपात्र उमेदवार ठरवले पात्र, घोटाळ्यानंतर मोठा निर्णय

Investigate the TET exam scam through SIT
Investigate the TET exam scam through SITsakal
Updated on

शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी) २०१८ मधील परीक्षेत झालेल्या गैरप्रकाराच्या आत्तापर्यंतच्या तपासामध्ये १७७८ जण अपात्र असतानाही पात्र ठरल्याचे चौकशीतून पुढे आले आहे. याच गुन्ह्यात आणखी बारा आरोपी निष्पन्न झाले असून सायबर पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. (TET scam)

आरोग्य विभाग, म्हाडा पाठोपाठ सायबर पोलिसांनी २०१९-२० च्या ‘टीईटी’ परीक्षेतील गैरव्यवहार पुढे आणला होता. उमेदवारांकडून पैसे घेऊन परिक्षेच्या निकालामध्ये फेरफार करून काही जण अपात्र असतानाही त्यांना पात्र केल्याची माहिती पोलिसांच्या तपासात पुढे आली होती. (TET scam investigation by Pune Cyber Cell)

दरम्यान, २०१८ मध्येही याच प्रकारे गैरप्रकार झाल्याचे उघड झाल्यानंतर पोलिसांनी त्यामध्येही गुन्हा दाखल करून आत्तापर्यंत ८ आरोपींना अटक केली होती. त्यामध्ये आणखी १२ आरोपी निष्पन्न झाले असून पोलिसांकडून त्यांचा तपास सुरु आहे. २०१८ च्या परीक्षेमध्ये आत्तापर्यंत परीक्षेमध्ये एकूण १३१ परीक्षार्थींची बनावट प्रमाणपत्रे, वरिष्ठांकडे प्राप्त अर्ज, व्हाटस्‌अपचॅटमधील प्राप्त बैठक क्रमांकानुसार पोलिसांच्या तपासामध्ये ८२ जणांच्या निकालाची पडताळणी करण्यात आली.

त्यावेळी २१३ अपात्र उमेदवारांना पात्र केल्याचे पोलिसांच्या तपासामध्ये निष्पन्न झाले. तर टीईटीच्या १२ सप्टेंबर २०१८ मध्ये झालेल्या परीक्षेच्या मुळ निकालामध्ये ८१७ जणांचे गुण वाढविण्यात आल्याचे उघड झाले. त्या सर्वांची उत्तरपत्रिका उत्तरसुचीप्रमाणे पडताळणी करण्यात आली. त्यासंबंधीचा मूळ निकाल त्याच दिवशी ऑनलाइन जाहीर झाल्यानंतर संबंधित निकालामध्ये अपात्र असलेले आणखी ७१० व ३८ उमेदवारांचे गुण वाढवून त्यांची माहिती नंतर दोनदा संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासामध्ये स्पष्ट झाले. त्यानुसार, आत्तापर्यंत १७७८ अपात्र उमेदवारांना पात्र केल्याचे आढळून आले आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक डी. एस. हाके, पोलिस निरीक्षक अजय वाघमारे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Despite the Maharashtra government's decision to increase the Pink E-Auto subsidy to 40%, only 17 women have started operations in Pune over the last two years, highlighting implementation challenges.
Researchers across Maharashtra have opposed the revised BARTI, SARTHI, MAHAJYOTI and ARTI PhD fellowship guidelines, citing the 100-seat cap per academic year and removal of HRA and contingency grants.
Pune crime news
Pune Municipal Corporation
Marathi News Esakal
www.esakal.com