पुणे - पुणे स्टेशन परिसरात असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना प्रकरणातील आरोपीने न्यायालयाचा अवमान केला. न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? आम्ही बांगड्या घातल्या नाहीत? असे म्हणत न्यायालयाचा अवमान करणाऱ्या आरोपीस न्यायालयाने एक हजार रुपये दंड आणि सात दिवस कारावासाची शिक्षा सुनावली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डॉ. जी. आर. डोरणपल्ले यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला.