वडगाव शेरी - स्थानिक रहिवाशांना विश्वासात न घेता पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल केल्यामुळे नियमित सुरू असलेला पाणीपुरवठा आज विमाननगर भागात विस्कळीत झाला. पाणीपुरवठ्याची गेल्या 30 वर्षांपासून असलेली वेळ कायम ठेवावी अशी मागणी करत म्हाडा कॉलनीतील रहिवाशांनी अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.