esakal | जिल्ह्यात तेरा लाख मोफत शिवभोजन थाळ्यांचे वाटप
sakal

बोलून बातमी शोधा

pune

जिल्ह्यात तेरा लाख मोफत शिवभोजन थाळ्यांचे वाटप

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात मागील साडेतीन महिन्यांच्या कालावधीत सुमारे तेरा लाख शिवभोजन थाळ्यांचे मोफत वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यात कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी सुरू करण्यात आलेल्या निर्बंधांच्या काळात शेतमजूर, निराधार आणि दिव्यांगांना दोन वेळचे जेवण उपलब्ध व्हावे, या उद्देशाने राज्य सरकारने मोफत शिवभोजन थाळी वाटप उपक्रम सुरु केला आहे.

जिल्ह्यात पूर्वी प्रती थाळी पाच रुपयांचा दर आकारला जात असे. परंतु १५ एप्रिल २०२१ पासून या उपक्रमांतर्गत मोफत शिवभोजन थाळी उपलब्ध करून दिली जात असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने यांनी सांगितले.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात १ एप्रिल २०२० पासून शिवभोजन थाळी योजना सुरु केली आहे. ही योजना सुरु झाल्यापासून १५ एप्रिल २०२१ पर्यंत प्रती थाळी पाच रुपये द्यावे लागत असत. परंतु कोरोना संसर्गात वाढ झाल्याने, याला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले. त्यामुळे १५ एप्रिल २०२१ पासून ही थाळी मोफत देण्यास सुरवात केली आहे. ग्रामीण भागात रोज सरासरी ७ हजार १५० थाळ्यांच्या वाटपाचे उदिष्ट निश्‍चित केले आहे. प्रत्यक्षात दररोज सरासरी ९ हजार ८६५ इतक्या थाळ्यांचे वाटप होत आहे. यानुसार आतापर्यंत १३ लाख १३ हजार ८८२ एवढ्या शिवभोजन थाळ्यांचे मोफत वाटप झाले आहे.

हेही वाचा: जात प्रमाणपत्र देण्यास ३० दिवसांची मुदतवाढ

ग्रामीणमध्ये ७८ शिवभोजन थाळी केंद्र

ग्रामीण भागातील शेतमजूर, दिव्यांग आणि निराधारांना मोफत शिवभोजन थाळी वाटप करण्यासाठी जिल्ह्यात एकूण ७८ शिवभोजन थाळी वाटप केंद्र सुरु केले आहेत. या केंद्रांची तालुकानिहाय संख्या पुढीलप्रमाणे आहे. आंबेगाव व पुरंदर प्रत्येकी - ४, जुन्नर- ८, खेड व मावळ प्रत्येकी - ६, मुळशी -७, शिरूर, दौंड व इंदापूर प्रत्येकी -५, भोर- ३, वेल्हे- १, बारामती -१५ आणि हवेली- ९ अशी तालुकानिहाय केंद्रांची संख्या असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने यांनी सांगितले.

loading image
go to top