

फोटो - PNE26W41986
मुंबई ः जिल्हा बॅंक निवडणुकीबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करताना आमदार आशुतोष काळे, आमदार काशिनाथ दाते, पक्षाचे नेते.
जिल्हा बॅंक निवडणुकीच्या
तयारीला लागा ः पवार
अहिल्यानगर, ता. १२ ः आगामी काळात होणाऱ्या अहिल्यानगर जिल्हा बॅंक निवडणुकीच्या तयारीला लागा, अशा सूचना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी जिल्ह्यातील नेत्यांना दिल्या.
मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व जिल्हा बॅंकेच्या माजी पदाधिकाऱ्यांनी पवार यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील स्थितीबाबत माहिती दिली. पवार यांनी जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीबाबत तालुकानिहाय मतदार, ठराव याबाबतची माहिती घेतली. प्रत्येक तालुक्यानुसार चर्चा करण्यात आली. आगामी काळात होणाऱ्या जिल्हा बँक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रमुख नेत्यांचे म्हणणे पवार यांनी ऐकून घेतले.
बैठकीस सहकारमंत्री बाबासाहेब पाटील उपस्थित होते. यावेळी आमदार आशुतोष काळे, आमदार काशिनाथ दाते, जिल्हा बॅंकेचे मावळते अध्यक्ष चंद्रशेखर घुले, सीताराम गायकर, राजेंद्र नागवडे, अरुण तनपुरे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, प्रशांत गायकवाड, माजी आमदार राहुल जगताप, अशोक सावंत आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.