

टुडे १
........
लोगो ः जिल्हा बँक
फोटो ः बाळासाहेब थोरात GHR26A09502
जिल्हा बँकेसाठी बिनविरोधचा मार्ग काढणार !
बाळासाहेब थोरात ः सर्वांना विचारात घेऊन निर्णय
संगमनेर,ता. ६ ः जेव्हा बिनविरोध निवडणुकीचा प्रयत्न केला जातो, त्यावेळी उमेदवारी अर्जांची संख्या काही प्रमाणात वाढते. जिल्ह्यात सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे. आपल्या नावाचा विचार व्हावा, या उद्देशाने अनेक कार्यकर्ते उमेदवारी अर्ज दाखल करतात. मात्र, जिल्ह्यातील सर्व नेत्यांनी माझ्याकडे बैठक झाली पाहिजे, अशी भूमिका मांडली. त्यानुसार आम्ही चर्चा केली असून, सर्वांना विचारात घेऊनच पुढील निर्णय घेत आहोत, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. मंगळवारी (ता. ६) थोरात पत्रकारांशी बोलत होते.
थोरात म्हणाले, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे हे वैचारिक कार्यकर्ते आहेत. जिल्हा बँक चांगल्या पद्धतीने चालली पाहिजे, यासाठी ते निश्चितपणे सहकार्य करतील. बँक पुढे गेली पाहिजे, असा त्यांचा विचार आहे. त्यामुळे सहकार क्षेत्रातील सर्व घटकांना सोबत घेऊन जिल्हा बँकेचे कामकाज अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न राहणार आहे. जिल्हा बँकेची भूमिका केवळ आर्थिक व्यवहारापुरती मर्यादित नसून, जिल्ह्यातील शेतकरी आणि सहकार क्षेत्राच्या विकासासाठी बँकेचे मोठे योगदान आहे. जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे. अडचणीच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी बँक उभी राहिली पाहिजे. त्याचबरोबर साखर कारखाने आणि दूध संघांच्या पाठीशीही बँकेने ठामपणे उभे राहिले पाहिजे. बँक सक्षम झाली, तर त्याचा फायदा जिल्ह्यातील संपूर्ण सहकार क्षेत्राला होईल. हीच सर्वांची भूमिका आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे निवडणुकीचे चित्र सध्या रंगतदार झाले असले, तरी सहकार क्षेत्रातील सर्व घटकांना सोबत घेऊन बिनविरोध निवडणुकीचा मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. सर्वांशी चर्चा करून, सर्वांना विश्वासात घेऊनच पुढील निर्णय घेतला जाईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.