जिल्हा परिषदेच्या दोन्ही बाजूला होणार लिफ्ट

जिल्हा परिषदेच्या दोन्ही बाजूला होणार लिफ्ट
Published on

जिल्हा परिषद मुख्य इमारतीसह
शिक्षण, आरोग्य विभागासही लिफ्ट

लिफ्टसाठी निधी शासनाकडून की सेसमधून यावर होणार निर्णय

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १३ ः जिल्हा परिषदेत तीन महिन्यांपासून लिफ्ट बसवण्याची चर्चा सुरू आहे. यावर सदस्यांसह अधिकाऱ्यांनीही लिफ्टची मागणी केली आहे. याबाबत नुकत्याच झालेल्या बांधकाम समितीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. जिल्हा परिषद इमारतीच्या दोन्ही बाजूला लिफ्ट बसवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी संबंधित पुरवठादाराकडून कोटेशनही मागवण्यात आले आहे. शासनाच्या निधीतून बसवायचे की सेस फंडातून यावर पुढील बैठकीत अंतिम निर्णय होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर प्रमुख कार्यालये आहेत. दुसऱ्या मजल्यावर सर्व पदाधिकाऱ्यांची तर तिसऱ्या मजल्यावर बांधकाम, पाणीपुरवठा, जलसंधारण विभागाचे कार्यालये आहेत. या कार्यालयात अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी जाताना वृद्घ, महिला व दिव्यांग व्यक्तीस जाण्यास त्रास होतो. यामुळे लिफ्ट बसवण्याची मागणी समोर आली. यावर चर्चा होऊन लिफ्ट बसवण्यास मंजुरी मिळाली आहे. पण आता त्यावर होणारा खर्च कोणत्या हेडखाली करायचा यावर निर्णय होणे शिल्लक आहे. मुख्य इमारतीस लिफ्टची सुविधा झाल्यास महिला व बालकल्याण व पशुसंवर्धन विभागात जाणाऱ्या नागरिकांनाही सुविधा मिळणार आहे.

चौकट...
शिक्षण, आरोग्य विभागास लिफ्ट...
जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीसह मागील बाजूस असलेल्या शिक्षण, आरोग्य विभागाच्या तीन मजली इमारतीत लिफ्टची मागणी पुढे आली आहे. जिल्ह्यातून अनेक शिक्षक व आरोग्य विभागातील कर्मचारी वैयक्तिक कामांसाठी येत असतात. यामुळे दुसऱ्या मजल्यावरील आरोग्य व तिसऱ्या मजल्यावरील माध्यमिक शिक्षण विभागामध्ये मोठी गर्दी असते. त्यांची सोय होण्यासाठी लिफ्ट बसवण्यात येणार आहे.


जिल्हा परिषदेत लिफ्ट बसवण्याची चर्चा झाली आहे. मुख्य व शिक्षण विभागाच्या इमारतीमध्ये लिफ्टची गरज आहे. अपंग, वृद्धांना भेटण्यास येणार अडचण होत आहे. लिफ्ट बसवण्याबाबत कोटेशनही मागवण्यात आले आहे. यावर चर्चा करून लवकरच अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.
- इंद्रजित पवार, उपाध्यक्ष तथा सभापती अर्थ व बांधकाम विभाग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com