

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या उद्यापासून क्रीडा स्पर्धा
रविवारी सांस्कृतिक स्पर्धा; शाहू क्रीडा संकुलात होणार आयोजन
नागठाणे, ता. ५ : जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वार्षिक क्रीडा स्पर्धेला शनिवारपासून (ता. ७) प्रारंभ होत आहे. साताऱ्यातील शाहू क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धा तीन दिवस चालणार आहेत.
विविध क्रीडा प्रकारांत या स्पर्धा खेळविल्या जाणार आहेत. त्या दृष्टीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश घुले यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेची तयारी पूर्ण झाली आहे. स्पर्धेत खो- खो पुरुष, खो- खो महिला, बॅडमिंटन एकेरी व दुहेरी (पुरुष व महिला), क्रिकेट पुरुष, कबड्डी पुरुष, कबड्डी महिला, कॅरम (पुरुष व महिला), बुद्धिबळ (पुरुष व महिला), व्हालिबॉलपुरुष, पासिंग बॉल महिला, टेबल टेनिस एकेरी व दुहेरी (पुरुष व महिला), रस्सीखेच पुरुष, रस्सीखेच महिला, रिले धावणे पुरुष व महिला, थाळीफेक (पुरुष व महिला), योगसने (पुरुष व महिला) हे क्रीडा प्रकार आहेत. या स्पर्धा सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत होणार आहेत. त्यासाठी विविध क्रीडा समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ११ तालुक्यांसह जिल्हा मुख्यालयाचा संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहे. शनिवारी संचलनाने स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. या संचलनाचे नेतृत्व प्रत्येक तालुक्याचे गटविकास अधिकारी करणार आहेत. त्यासाठी प्रत्येक तालुक्याला पोशाखाचे रंग ठरवून देण्यात आले आहेत.
चौकट
रविवारी सांस्कृतिक कार्यक्रम
रविवारी (ता. ८) रोजी जिल्हा परिषदेच्या (कै.) यशवंतराव चव्हाण बहुद्देशीय सभागृहात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात समूह नृत्याचा समावेश आहे. सोमवारी (ता. ९) स्पर्धेतील अंतिम सामने, तसेच पारितोषिक वितरण कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.