जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा
जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा
गोंदवले, ता. ७ : शैक्षणिक व सामाजिक विकास संस्था गुरसाळे (ता. खटाव) व नूतन प्राथमिक मराठी शाळा गोंदवले बुद्रुक यांच्या वतीने शिक्षणप्रेमी (कै.) विष्णू बाजी जाधव (पाटील) यांच्या स्मरणार्थ प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शनिवारी (ता. १४) सकाळी नऊ वाजता जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
गोंदवले बुद्रुक येथील नूतन प्राथमिक मराठी शाळेत होणाऱ्या या स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा, खासगी अनुदानित, खासगी विनाअनुदानित, तसेच कायम विनाअनुदानित अशा सर्व माध्यमांच्या प्राथमिक स्तरावरील इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना सहभागी होता येईल. लहान गटासाठी (इयत्ता पहिली व दुसरी) माझे बाबा, माझा आवडता नेता, निसर्ग माझा सोबती, सूर्य उगवला नाही तर हे विषय देण्यात आले आहेत, तसेच मोठ्या गटासाठी (इयत्ता तिसरी व चौथी) मी सावित्री बोलतेय, माझा देश माझा अभिमान, सोशल मीडिया शाप की वरदान, पुस्तके आमचे खरे मित्र हे विषय निश्चित करण्यात आले आहेत. या स्पर्धेतील उत्कृष्ट वक्त्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. स्पर्धेत होण्यासाठी विद्यार्थ्यांनी अथवा शाळांनी येत्या गुरुवारपर्यंत (ता. १२) नोंदणी करण्याचे आवाहन संयोजकांकडून करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

