काकडेतील मेळाव्यात १५२ उमेदवारांना रोजगार
सोमेश्वरनगर, ता. ३ ः येथील मु. सा. काकडे महाविद्यालयात शनिवारी (ता. २८) महाराष्ट्र शासनाच्या रोजगार, कौशल्य विकास व उद्योजकता केंद्र आणि महाविद्यालयाच्या वतीने ‘जिल्हास्तरीय रोजगार महामेळावा’ पार पडला. यामध्ये सहभागी झालेल्या जिल्ह्यातील वीस कंपन्यांकडे ३५७ उमेदवारांनी मुलाखती दिल्या. त्यापैकी १५२ उमेदवारांना नोकरी मिळाली आहे.
सलग दुसऱ्या वर्षी काकडे महाविद्यालयाने मेळाव्याचे यशस्वी नियोजन केले. महामेळाव्याचे उद्घाटन उद्योजक आर. एन. शिंदे यांच्या हस्ते आणि महाविद्यालयाच्या विकास समितीचे प्रमुख अभिजीत काकडे यांच्या उपस्थितीत झाले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे हे अध्यक्षस्थानी होते. या प्रसंगी महाविद्यालयाचे सचिव सतीश लकडे, कौशल्य विकास अधिकारी राजेश धर्माधिकारी, सहायक अधिकारी रामेश्वरी पालवे, राजू डोईफोडे, अजय रणदिवे, सागर सरगर आदी उपस्थित होते. या मेळाव्यात कंपन्यांच्या प्रमुखांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक डॉ. राहुल खरात यांनी केले. प्रा. अच्युत शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. तर, प्रा. आरती वाघ यांनी आभार मानले. या मेळाव्यात पुण्यासह सातारा जिल्ह्यातील तरूणांनीही सहभाग नोंदविला. एरवी उच्चशिक्षित तरुणांसाठी मेळावे होतात परंतु या मेळाव्यात बारावी, आयटीआय, डिप्लोमा, कला-वाणिज्य पदवीधर तरुणांची निवड करण्यात आल्याचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांनी सांगितले. या वेळी मुख्यमंत्री प्रशिक्षण योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन कौशल्य विकास अधिकारी राजेश धर्माधिकारी यांनी केले. तसेच, एका वर्षात चाळीस ठिकाणी रोजगार मेळाव्याचे नियोजन केले असून आतापर्यंत झालेल्या वीस मेळाव्यात अनेक तरूणांना नोकऱ्या मिळाल्याची माहिती रामेश्वरी पालवे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

