Palkhi Highway : दिवेघाटात महामार्गाच्या कामामुळे वाहतूक जास्त काळ थांबवल्याने ग्रामस्थ व कंत्राटदारांमध्ये वाद निर्माण झाला; पोलिसांनी हस्तक्षेप करून वाद शांत केला.
फुरसुंगी : पालखी महामार्गावरील दिवेघाट दरम्यान वडकी ग्रामस्थ, प्रवासी आणि कंत्राटदार यांच्यामध्ये जास्त काळ वाहतूक थांबविल्याने मंगळवारी वाद झाल्याचा प्रकार घडला. पोलिसांनी मध्यस्थी केल्याने हा वाद मिटला.