

Dive Ghat to Remain Closed for Two Hours on Feb 23 Due to Alandi–Pandharpur Highway Widening Work
esakal
पुणे : आळंदी-पंढरपूर पालखी महामार्गावरील दिवेघाट परिसरात रस्त्याचे रुंदीकरण करण्याच्या कामासाठी उद्या सोमवार, २३ फेब्रुवारी रोजी दुपारी दोन तास वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात येणार आहे. हडपसर ते दिवेघाट या विभागात दुपारी एक ते तीन या वेळेत कोणत्याही प्रकारची वाहतूक सुरू राहणार नाही. वाहतूक पोलिस विभागाने यासंबंधीची माहिती जाहीर केली आहे.