

Funeral rites of eight Alandi students after the Diveagar tragedy
esakal
आळंदी : ‘‘समुद्राच्या पाण्यामुळे चेहऱ्याची त्वचा खराब होईल म्हणून मी पाण्यात न जाता बाजूलाच उभे राहणे पसंत केले...आणि वाचलो. पण डोळ्यांदेखत माझे आठ मित्र लाटांमध्ये गायब झाले,’’ अशी माहिती थरथरत्या आवाजात सोहम गोविंद गोरे या विद्यार्थ्याने दिली.
आळंदीतील स्मशानभूमीत सुमीत अहिरे, तन्मय वहिले, कैवल्य वासनकर आणि प्रणव बनसोडे यांच्यावर अंत्यविधी करण्यात आला. हे सर्व शाळेपासून एकत्र होते. सोहम आणि त्याचे आई-वडील स्मशानभूमीत आले होते,