

Funeral rites of eight Alandi students after the Diveagar tragedy
esakal
आळंदी, : दिवेआगरच्या समुद्राने आळंदीतील आठ स्वप्नं हिरावून नेली. ‘विनर्स अकॅडमी’तील आठ कोवळ्या विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यातील चार विद्यार्थ्यांवर आळंदीत, दोघांवर केळगावात, तर एकावर मातापूर (ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) आणि एकावर वायगाव (ता. भातकुली, जि. अमरावती) येथे अश्रूंच्या महापुरात अंत्यसंस्कार करण्यात आले. कालपासून आळंदी शहर शोकसागरात बुडाले आहे. कोवळ्या वयातील मुलांचे असे अचानक जाणे पाहून आळंदीकर पूर्णपणे निःशब्द झाला होता.