दवाखाने सुरु ठेवा ! शहरातील खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना आवाहन 

The Divisional Commissioner Office appealed to the private medical professionals to open clinic
The Divisional Commissioner Office appealed to the private medical professionals to open clinic
Updated on

पुणे : शहरातील खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी कोरोनासदृश्य परिस्थितीत आपले दवाखाने सुरु ठेवावेत. दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांना सर्दी, खोकला, घसादुखी या आजाराची लक्षणे असल्यास त्यांना कै. द्रौपदाबाई मुरलीधर खेडेकर हॉस्पिटल, बोपोडी येथील रुग्णालयात पाठविण्याची व्यवस्था करावी, असे आवाहन विभागीय आयुक्त कार्यालयाने केले आहे.

संपर्क क्रमांक020-25818323, डॉ.स्वाती बढीये (निवासी वैदयकीय अधिकारी, बोपोडी ) 8806668747 याचप्रमाणे पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रामध्ये महापालिकेच्या अथवा इतर खासगी दवाखान्यांमध्ये कोरोनाची लक्षणे असलेला रुग्ण आढळून आल्यास अशा रुग्णास यशवंतराव चव्हाण रुग्णालय अथवा भोसरी येथील नुतन भोसरी रुग्णालयामध्ये (कोरोना बाधित रुग्णांसाठी विशेष व्यवस्था असलेले) दाखल करून त्यावर पुढील उपचार करण्यात येतील. यासाठी संपर्क दुरध्वनी क्रमांक 020-67331307

स्थलांतरीत कामगारांसाठी पुणे विभागामध्ये जिल्हा प्रशासनमार्फत  97 आणि साखर कारखान्यामार्फत 446 असे एकूण 543 कॅम्प उभारण्यात आले आहेत. यामध्ये 26 हजार 472  स्थलांतरीत कामगार असून एकूण 85 हजार 148 कामगारांना जेवण देण्यात येत आहे.

बाजार समित्यांना पोलिस बंदोबस्त द्या - विभागीय आयुक्त
कृषि उत्पन्न बाजार समित्या सुरू रहाण्यासाठी पोलीस विभागाकडून डिजिटल पासेस मिळेपर्यंत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, आडते व कामगार यांना दिलेल्या ओळखपत्रांनुसार कृषी उत्पन्न बाजार समित्यामध्ये प्रवेश द्यावा. तसेच, कृषी उत्पन्न बाजार समितीस पोलीस बंदोबस्त देण्यात यावा, अशा सूचना विभागीय आयुक्तांनी पोलीस विभागास केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com