
पुणे : पती आणि त्याच्या कुटुंबावर आठ वर्ष पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा खटला चालला. पत्नीच्या भावाने तिला माहेरी नेले व ती परत आलीच नाही. पत्नीच्या या कृत्याचे तिच्या भावाने आणि वडिलांनी समर्थन केले. पत्नीने दाखल केलेल्या खटल्यातून पती व त्याच्या कुटुंबीयांना निर्दोष सोडण्यात आले. या सर्व तथ्यांवरून स्पष्ट होते की, पत्नीने पतीशी क्रूर वर्तन केले. त्यामुळे पतीला क्रूरतेच्या आधारावर घटस्फोट मिळण्याचा अधिकार आहे, असे नमूद करत येथील सत्र न्यायालयाने पतीने दाखल केलेला घटस्फोटाचा दावा मंजूर केला.