घटस्फोटासोबतच दाम्पत्याचा ‘पॅरेंटिंग प्लॅन’

घटस्फोटासोबतच दाम्पत्याचा ‘पॅरेंटिंग प्लॅन’
Published on: 

पुणे, ता. १३ : वैचारिक मतभेदांमुळे पती-पत्नी म्हणून विभक्त होण्याचा निर्णय घेतल्यानंतरही मुलीच्या भवितव्याची जबाबदारी मात्र दोघांनीही समानपणे स्वीकारली. दहा वर्षांच्या मुलीच्या शिक्षणापासून संगोपनापर्यंत प्रत्येक बाबीचा विचार करून आयटी क्षेत्रातील दाम्पत्याने घटस्फोटासोबतच ‘पॅरेंटिंग प्लॅन’ तयार केला. हा आराखडा घटस्फोटाच्या दाव्यासोबत न्यायालयात सादर करण्यात आला.

आयटी कंपनीत उच्च पदावर कार्यरत असलेल्या सुरेश आणि सुरेखा (नावे बदललेली) यांचा बारा वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांना दहा वर्षांची मुलगी आहे. मात्र, वैचारिक मतभेदांमुळे गेल्या साडेचार वर्षांपासून दोघे विभक्त राहत होते. मुलगी आईकडे राहत असली, तरी वडील नियमित तिच्या संपर्कात होते. दोघेही मुलीच्या शिक्षणाकडे लक्ष देत होते. अखेर दोघांनी परस्परसंमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, मुलीच्या संगोपनासाठी त्यांनी सामंजस्याने नियोजन केले. मुलीचा ताबा आईकडे ठेवण्यासह तिच्या शिक्षणाचा खर्च दोघांनी निम्मा-निम्मा उचलण्याचे ठरविले. त्यासाठी दरवर्षी बँकेत ठरावीक रक्कम जमा करणे, शिक्षणासंबंधी महत्त्वाचे निर्णय एकत्र घेणे तसेच सुट्ट्या आणि सणासुदीला मुलगी कोणासोबत राहणार, याचेही नियोजन केले.

विशेष म्हणजे, आई किंवा वडिलांपैकी एकाचा अथवा दोघांचाही मृत्यू झाल्यास मुलगी सज्ञान होईपर्यंत तिचा सांभाळ कोण करणार, याचीही तरतूद केली आहे. हा संपूर्ण आराखडा घटस्फोटाच्या दाव्यासोबत न्यायालयात सादर करण्यात आला. पुणे कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश ए. बी. यादव यांनी या निर्णयाचे कौतुक करत घटस्फोटाचा दावा निकाली काढला.

पालकांमधील वादाचा मुलांच्या मनावर खोलवर परिणाम होतो. मुलांना दोघांचेही प्रेम आणि सहवास आवश्यक असतो. त्यामुळे मुलांच्या हिताचे निर्णय एकत्र घेता यावेत, यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने ‘पॅरेंटिंग प्लॅन’च्या मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्याचा वापर करून पालकांनी सामंजस्याने तोडगा काढावा.
- ॲड. वंदना घोडेकर, दाम्पत्याच्या वकील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.