

लोणी काळभोर, ता. १३ : घटस्फोटानंतर पत्नीच्या जुन्या फेसबुक खात्याचा गैरवापर करून तिचा आणि तिच्या मित्राचा वैयक्तिक फोटो अपलोड केल्याप्रकरणी अभिजित उदय देशमुख (रा. थेऊर, ता. हवेली) याच्याविरुद्ध लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी एका ३५ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि अभिजित देशमुख यांचा विवाह २०२३ मध्ये झाला होता. मात्र, कौटुंबिक वादातून त्यांचा कायदेशीर घटस्फोट झाला. त्यानंतर महिला आपल्या आई-वडिलांकडे राहू लागली. १७ ऑगस्ट २०२६ ला महिलेच्या एका मित्रामार्फत तिच्या जुन्या फेसबुक खात्यावर तिचा आणि मित्राचा एकत्रित वैयक्तिक फोटो अपलोड केल्याची माहिती तिला मिळाली. या खात्याचा पासवर्ड घटस्फोटाआधी पतीकडे असल्याने, त्यानेच याचा गैरवापर केल्याचा संशय महिलेने व्यक्त केला.
महिलेने २९ ऑगस्टला सायबर क्राईम पोर्टलवर ऑनलाइन तक्रार दाखल केली होती. सायबर पोलिसांनी तांत्रिक चौकशी केल्यानंतर काही मोबाइल क्रमांक समोर आले. अखेर सोमवारी (ता. १२) महिलेने दिलेल्या तक्रारीवरून लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.