पुणे - दिव्यांगत्व म्हणजे अपयशाची खूण नव्हे, तर जिद्द आणि आत्मविश्वासाचे प्रतीक असू शकते, हे सिद्ध करून दाखवले आहे पुण्यातील एका तरुणाने. दोन्ही पाय ७० टक्के अधू असूनही तो शिवाजीनगर, सदाशिव पेठ आणि डेक्कन भागात खाद्यपदार्थ पोचविण्याचे (फूड डिलिव्हरी) काम करत आहे. त्याचा संघर्ष, मेहनत आणि जिद्द अनेकांसाठी प्रेरणास्थान बनली आहे.