Diwali 2022 : फटाके उडविताना फटका अचानक फुटल्याने लहान मुलगा जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

diwali 2022 small boy injured due to sudden explosion while bursting firecrackers

Diwali 2022 : फटाके उडविताना फटका अचानक फुटल्याने लहान मुलगा जखमी

पुणे : लक्ष्मी पूजनानंतर फटाका पेटवताना फटाक्याचा अचानक स्फोट झाल्याने लहान मुलगा जखमी झाल्याचा प्रकार घडला आहे. दरम्यान, मुलाची प्रकृती ठीक असून डोक्याला दुखापत झाली आहे, हि घटना सोमवारी रात्री 10 वाजता नऱ्हे परिसरात दरम्यान, सोमवारी रात्री शहरात 17 ठिकाणी आगीच्या घटना घडल्या. शिवांश अमोल दळवी असे या जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. सोमवारी रात्री लक्ष्मीपूजन झाल्या नंतर शहरात मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली होती.

शिवांश हा हि लक्ष्मी पूजन झाल्यानंतर रात्री 10 वाजता घराच्या बाहेर फटाके फोडत होता. रंगबेरंगी भुईनळा फटाका उडविताना तो अचानक फुटला, त्यामुळे शिवांश हा जखमी झाला. त्यास तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी त्याच्या कपाळाला भाजल्याचे तसेच डोळ्यांना इजा झाले नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. "आम्हाला अशा वाईट प्रसंगाला तोंड द्यावे लागले. त्यामुळे पालकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी" असे आवाहन शिवांश याच्या वडिलांनी केले आहे.