आली दिवाळी मोबाईल, टीव्ही आणि इलेक्ट्रॉनिक्सची खरेदी

आली दिवाळी मोबाईल, टीव्ही आणि इलेक्ट्रॉनिक्सची खरेदी
Published on: 

लोगो-आली दिवाळी

दिवाळीत गॅझेट खरेदीचा धमाका

मोबाईल, टीव्ही, लॅपटॉपला मागणी; कंपन्यांकडून सवलतींसह आकर्षक ऑफर्स

सातारा, ता. २ ः दिवाळीतील पाडवा आणि भाऊबीज या दोन्ही दिवशी इलेक्ट्रॅानिक्स आणि मोबाईल गॅझेटची खरेदी तुफान खरेदी करता यावी, यासाठी आतापासूनच नागरिकांचे नियोजन सुरू आहे. शहरातील विविध मोबाईल विक्रीची दुकाने, इलेक्ट्रॅानिक्स वस्तूंच्या विक्रीच्या दुकानांमध्ये अद्ययावत मॉडेल्स उपलब्ध झाली आहेत. ग्राहकांना हेडफोनपासून स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही, लॅपटॉप आदींची खरेदी करता यावी, यासाठी कंपन्यांसह व्यावसायिकांनी सवलतींचा पाऊस, आकर्षक योजना यासह कर्ज सुविधाची उपलब्धता ठेवली आहे.
मोबाईल खरेदीत युवा वर्गाचा उत्साह आहे. कॅमेरा, बॅटरी, साठवण क्षमता आणि किंमत या बाबी तपासून मोबाईलची निवड केली जात होती. स्वतःसाठी नवीन मोबाईल घेण्यासोबत कुटुंबीयांना भेट देण्यासाठीही ग्राहक पर्यायांच्या शोधात असल्याचे व्यावसायिकांनी नमूद केले. स्मार्टफोनमध्ये १५ हजार ते २५ हजार रुपयांपर्यंतच्या फोनला पसंती असली, तरी ५० हजार रुपयांपेक्षा अधिक किंमत असलेल्या ''फ्लॅगशिप'' फोनच्या विक्रीतही मोठी वाढ झाली आहे. दरम्यान जुन्या मोबाईलच्या बदल्यात मिळणारी किंमत, कर्जांच्या हप्त्यांची सुविधा आणि संबंधित अटी यांची माहिती घेऊन ग्राहक निर्णय घेतो, असेही विक्रेत्यांनी नमूद केले.
स्मार्ट टीव्हीमध्ये ३२ ते ७५ इंचपर्यंतचे टीव्ही बाजारात उपलब्ध आहेत. ग्राहक हा त्यांच्या आर्थिक नियोजनानुसार टीव्ही खरेदीसाठी नोंदणी करीत आहेत. यामध्ये मध्यवर्गीय कुटुंब ३२ ते ४३ इंचापर्यंत टीव्ही खरेदीस प्राधान्य देत आहे. टीव्हीमध्ये एक्स्चेंज योजना नसल्या, तरी सवलती देण्यात येतात. विशेष म्हणजे फोर के टीव्ही खरेदीसाठी कर्ज सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. याबरोबरच वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाइन शिक्षणामुळे लॅपटॉप खरेदीवर युवा वर्गाचा ओढा आहे. सुमारे ४० हजारपासून दोन ते तीन लाखांपर्यंत (कॉन्फिग्रेशनच्या मागणीनुसार) लॅपटॉप बाजारात उपलब्ध आहेत.


----------------------------------------------------

कोट

दिवाळी हा खरेदीसाठी शुभ मुहूर्त मानला जातो. याच पार्श्वभूमीवर आम्ही ग्राहकांसाठी मोबाईल खरेदीवर विविध आकर्षक ऑफर्स आणि खास भेटवस्तू उपलब्ध करून दिल्या आहेत. प्रत्येक ग्राहकाच्या गरजा, आवड आणि बजेट लक्षात घेऊन त्यांना योग्य मोबाईल निवडण्यासाठी आमच्या स्टोअरमध्ये मार्गदर्शन केले जाते. ग्राहकांनी केवळ खरेदी करून न जाता, उत्तम उत्पादन, आकर्षक ऑफर्स आणि विशेष भेटवस्तूंच्या माध्यमातून समाधानाचा आनंद घेऊन जावे, हाच आमचा प्रयत्न आहे. यंदाची दिवाळी ग्राहकांसाठी अधिक आनंददायी आणि फायदेशीर करण्याचा आमचा मानस आहे.

- रोहन शहा, म्हसवडकर स्टोअर्स, सातारा
-----------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.