
PMC Diwali Bonus
Sakal
पुणे : महापालिकेतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त ८.३३ टक्के बोनस त्याचप्रमाणे २५ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे. ही रक्कम दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. महापालिका व कामगार संघटनेतील कराराप्रमाणे सानुग्रह अनुदानाच्या रकमेत दोन हजार रुपयांची वाढ झाली आहे.