

TMB26B04250
टेंभुर्णी (ता. माढा) : ग्रामपंचायतीकडून कर्मचाऱ्यांना बोनससह दिवाळी फराळाचे वितरणप्रसंगी सरपंच सुरजा बोबडे, गटप्रमुख योगेश बोबडे, ग्रामपंचायत सदस्य सचिन होदाडे, सतीश नेवसे, गौतम कांबळे, सोमनाथ तांबे, तुकाराम डोके आदी.
---
टेंभुर्णी ग्रा.पं.च्या कर्मचाऱ्यांना
प्रत्येकी १० हजारांचा बोनस
दिवाळीनिमित्त ४ लाख ८० हजारांचे वितरण
सकाळ वृत्तसेवा
टेंभुर्णी, ता. ७ : सोलापूर जिल्ह्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टेंभुर्णी ग्रामपंचायतीच्या वतीने दिवाळीनिमित्त सर्व कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १० हजार रुपये बोनस आणि दिवाळी फराळाचे वितरण करण्यात आले. ग्रामपंचायतीतील ४८ कर्मचाऱ्यांना एकूण ४ लाख ८० हजार रुपयांचा बोनस देण्यात आला.
ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत कर्मचाऱ्यांना बोनस देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. यावेळी ग्रामविकास अधिकारी संजय साळुंखे यांनी या प्रस्तावाला अनुकूलता दर्शविली. त्यामुळे बोनस देण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. कर्मचाऱ्यांच्या कार्याप्रति कृतज्ञता व्यक्त करत ग्रामपंचायतीने दिवाळीनिमित्त त्यांना आनंदाची गोड भेट दिली.
शनिवारी (ता. ७) दुपारी ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित छोटेखानी कार्यक्रमात सरपंच सुरजा बोबडे आणि ग्रामपंचायतीतील सत्ताधारी गटाचे प्रमुख योगेश बोबडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत बोनस व फराळाचे वितरण करण्यात आले.
यावेळी सतीश नेवसे, ग्रामपंचायत सदस्य सचिन होदाडे, गौतम कांबळे, सोमनाथ तांबे आणि तुकाराम डोके यांनी मनोगत व्यक्त केले. ग्रामपंचायतीच्या विविध विकासकामांमध्ये तसेच दैनंदिन प्रशासकीय कामकाजात कर्मचारी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. कर्मचाऱ्यांच्या योगदानाची दखल घेत दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न ग्रामपंचायतीने केला. या उपक्रमामुळे उपस्थितांमध्ये समाधानाचे वातावरण होते. यावेळी सर्व खातेप्रमुखांसह ग्रामपंचायतीचे बहुतांश महिला व पुरुष कर्मचारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.