esakal | सोन्याची नाणी, वेढणीला मागणी; ग्राहकसंख्या वाढीची सराफ व्यावसायिकांना अपेक्षा 
sakal

बोलून बातमी शोधा

gold

सोने बाजारात खरेदीलाही वेग येऊ लागला आहे. सोन्याची नाणी, वेढणी, चांदीच्या नाण्यांना मागणी असून, पुढील काही दिवसांत ग्राहकसंख्या वाढेल, अशी अपेक्षा व्यावसायिकांनी व्यक्त केली. 

सोन्याची नाणी, वेढणीला मागणी; ग्राहकसंख्या वाढीची सराफ व्यावसायिकांना अपेक्षा 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - मंगलमय दिवाळीच्या सणाला आनंदाने सुरूवात झाली. या काळात धनत्रयोदशी महत्त्वाचा दिवस आहे. त्यामुळे सोने बाजारात खरेदीलाही वेग येऊ लागला आहे. सोन्याची नाणी, वेढणी, चांदीच्या नाण्यांना मागणी असून, पुढील काही दिवसांत ग्राहकसंख्या वाढेल, अशी अपेक्षा व्यावसायिकांनी व्यक्त केली. 

"पीएनजी ज्वेलर्स'चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ म्हणाले, ""दिवाळीमध्ये व्यवसायात पुन्हा वृद्धी होऊन पूर्ववत होईल, अशी अपेक्षा आहे. नवरात्री ते दसरा या काळात पूर्वीसारखीच ग्राहकसंख्या बघायला मिळाली, बाजारपेठ पूर्ववत होण्याचे हे संकेत आहेत. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील आणि कृषी व्यवसायाशी निगडित ग्राहकांमध्ये खरेदीची जास्त क्षमता दिसून येत आहे. उत्सवकाळात अजूनही सोने खरेदीला सर्वाधिक पसंती आहे. तरुण मंडळी आणि पहिल्यांदाच गुंतवणूक करत असलेल्या ग्राहकांसह अनेक ग्राहकही गुंतवणूक पर्याय म्हणून सोन्याला पसंती देत आहेत. कमी वजनाच्या दागिन्यांसाठी चांगले बुकिंग मिळत असून दिवाळी व धनत्रयोदशीला ग्राहक उत्पादने घ्यायला येतील.'' 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

अमेरिका निवडणुकीतील स्पष्ट निकालामुळे जागतिक स्तरावर सोन्याच्या किमतीमध्ये स्थिरता येईल. अमेरिकेमधील स्थिर सरकार हे अर्थकारणाला चालना देण्यासाठी स्टिम्युलसची घोषणा करणे अपेक्षित आहे. अशा कोणत्याही प्रकारचे प्रोत्साहन हे सोन्यासाठी सकारात्मक वातावरण तयार करेल. अल्पावधी दृष्टिकोन पाहता सोन्यात तेजी दिसून येईल, असेही गाडगीळ यांनी स्पष्ट केले. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

वेढणी, सोन्याची नाणी, चांदीला मागणी आहे. गेल्या महिनाभरात सोने बघून गेलेले आणि बुकिंग केलेल्या ग्राहकांनी खरेदीस सुरवात केली आहे. सोन्याचा भाव कमी होईल, या अपेक्षेने काही ग्राहक थांबले होते, ते खरेदी करू लागतील. यापुढील काही दिवसांत सोने बाजारातील खरेदी वाढेल. खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची संख्याही वाढू लागली आहे. 
- अतुल अष्टेकर, संचालक, केआरए ज्वेलर्स 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

loading image