Diwali Festival दिवाळी निमित्त एकावन्न निराधार कुटुंबांना किराणा साहित्य वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Diwali Festival

Diwali Festival : दिवाळी निमित्त एकावन्न निराधार कुटुंबांना किराणा साहित्य वाटप

नारायणगाव : दिवाळी सणाचे औचित्य साधून येथील अर्थसंपदा पतसंस्थेच्या वतीने एकावन्न निराधार कुटुंबांना दिवाळी फराळ तयार करण्यासाठी आवश्यक किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले.हभप शोभाताई तांबे,अर्थसंपदा पतसंस्थेचे अध्यक्ष रमेश मेहेत्रे, उपसरपंच ज्योती संते, माजी सरपंच जंगल कोल्हे यांच्या हस्ते किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले.

या वेळी यावेळी माजी उपसरपंच एम. डी. भुजबळ ,विनायक भुजबळ ,सचिन भोर,वसंतराव कोल्हे ,अनंत भोर, प्रकाश नेहरकर, वर्षा तांबे, निलेश कोल्हे आदी उपस्थित होते. अध्यक्ष रमेश मेहेत्रे म्हणाले अर्थकारण करत असताना समाजाचे काही तरी देणे लागतो या भावनेतून आम्ही काम करत आहोत.

आपल्या बरोबर निराधार कुटुंबांना दिवाळीचा आनंद मिळावा या भावनेतून किराणा साहित्याचे वाटप केले आहे. संस्थेच्या वतीने कोरोना काळात गरजूंना धान्य व किराणा साहित्य, मास्क वाटप केले होते. अर्थसंपदा पतसंस्थेच्या या उपक्रमाचे हभप शोभाताई तांबे यांनी आपल्या मनोगतात कौतुक केले.

सूत्रसंचालन अमोल पानसरे यांनी केले. आभार रुपेश कानडे यांनी मानले. नारायणगाव( ता.जुन्नर) : निराधार कुटुंबांना किराणा साहित्य वाटप प्रसंगी लाभार्थी व संस्थेचे पदाधिकारी.