pune jewellery shopping crowd
sakal
पुणे - दिवाळीचा उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून, बाजारपेठांमध्ये खरेदीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. सोने-चांदी, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि वाहनांच्या खरेदीत मोठी वाढ दिसून येत आहे. आर्थिक परिस्थिती स्थिर झाल्याने आणि ग्राहकांच्या हातात उपलब्ध उत्पन्न वाढल्याने या वर्षीची दिवाळी विक्रमी खरेदीची ठरण्याची चिन्हे आहेत.